Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या...तर कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा सुषमा अंधारेंना इशारा

…तर कानाजवळ डीजे वाजवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा सुषमा अंधारेंना इशारा

मुंबई | Mumbai

नुकत्याच झालेल्या गणपती विसर्जन मिरवणूकीतील डी.जे च्या (DJ) दणदणाटावर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Post On DJ) यांनीही ट्वीट करत याबद्दल भाष्य केले होते. राज ठाकरे यांच्या ट्वीटनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी नातवाला त्रास झाला म्हणून बडा नेता बोलेल, असा टोला लगावला होता. आता त्यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

शालिनी ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत सुषमा अंधारेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शालिनी ठाकरे म्हणाल्या, “अंधारेबाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही”, अशी खरमरीत पोस्ट केली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकावर’डेक्कन क्वीन’ पकडताना दोन प्रवाशी पडले; एकाचा मृत्यू तर एक जखमी

शालिनी ठाकरेंची पोस्ट

“हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतेय.”

“सध्या मराठीबाबत तांडव सुरू असताना तुमचे शिल्लक सेना प्रमुख आणि त्यांचे बगल बच्चे शांतच आहेत. अशा वेळी फक्त मनसे (MNS) आणि राजसाहेब सडेतोड भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणुनच राजसाहेबांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात…”

कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या ‘गट’ प्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी तुमच्या ‘गट’ प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते. मग तुमच्या सारखे चेले – चपाटे तरी कसे मागे राहतील? यातूनच तुमच्या पक्षाची संस्कृती दिसते.

अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. ज्या बाबी पटत नसतील त्याला विरोध जरूर करा. मात्र विरोधाची भाषा, स्तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल असा ठेवा… असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला भिडण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका! स्टार खेळाडूला डेंग्यूची लागण

सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटावर टीका करताना त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर पोस्टही लिहिली होती. त्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला होता. “एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसे चालेल? यावर बोलले पाहिजे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या