'राजा वही बनेगा जो हकदार होगा'; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

'राजा वही बनेगा जो हकदार होगा'; मनसे नेत्याच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केल्यानंतर आता शिवसेना नक्की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी “अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा,” असं ट्वीट केलं आहे. तसेच या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबतचा (Balasaheb Thackeray) राज ठाकरेंचा (Raj Thackeray) फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या तब्बल चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हिंदुत्व आणि भाजपशी युतीच्या मुद्द्यावर आमदारांनी बंडखोरी केली. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com