
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता. २७ नोव्हेंबर) मुंबईतील गोरेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत पालिका निवडणुका आणि अन्य राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
या सभेपूर्वी मनसेकडून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर “महाराष्ट्रातील राजकारणाने हीन पातळी गाठली अशी सर्वदूर भावना आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार आणि त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!,” असं लिहण्यात आलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्त्याचा समाचार या सभेत राज ठाकरे हे घेणार का?, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.