Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई | Mumbai

राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा याबाबत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं होतं. त्यात प्रामुख्यानं पाच मागण्या केल्या होत्या.

- Advertisement -

तसंच, लशींचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक आदी अन्य संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. अखेर केंद्र सरकारने याबाबत काल निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

लसींची संख्या वाढावी यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लसींच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने मागणी परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या