Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'इंजिना'ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन...; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

‘इंजिना’ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन…; राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात जे पक्ष सत्तेत आहेत तेच विरोधात आहेत. शिवसेना,राष्ट्रवादी सत्तेतही आहेत आणि विरोधातही हे असले राजकारण देशाने आतापर्यंत पाहिले नसेल. नागरिकांचा केवळ मतदानासाठी वापर केला जात आहे. राज्यात कायदा नावाची गोष्ट उरलेली नाही. दादरमध्ये मनसेची मुंबई, ठाणे, कोकणमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हा हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

“सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशी परिस्थिती कधी जगात पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं का? नुसते आपले चालू आहे. दिवस ढकलत आहेत”, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.

फडणवीसांच्या घरासमोर पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO शेअर करत संजय राऊत म्हणाले….

मी याआधी सांगितले होते, की राज्यातील सर्व ब्रिजेसचे ऑडिट व्हायला हवे. मात्र कोणाचे याकडे लक्ष नाही. तुम्ही जगा, मरा, काहीही करा, त्यांना काहीही फरक पडत नाही. फक्त मतदान करा, येवढे फक्त सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले. कोणाला नागरिकांची चिंताच नाही. “महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत. एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष बाहेर आहे”, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, टोलचा विषय आहेच. आतापर्यंत टोलनाक्यांवर ९० कॅमेरे मनसेचे लागलेले आहेत. किती गाड्या येतात किती जातात हे समजतच नाही. मुंबई, ठाणे RTO मध्ये रोजच्या हजार हजार गाड्या रजिस्टर होतायत आणि टोलवर गाड्या तेवढ्याचं. असे कसे होईल? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. आता टोलनाक्यांवरची येलो लाईन वगैरे बघा, त्यावर लक्ष घाला. येलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली की डायरेक्ट लंकेला पळवायची, असे राज ठाकरे म्हणाले.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा गौप्यस्फोट

राज्यात कायदा नावाची काही गोष्टच उरली नाही. कोणाला काही कडक शासन होईल, याची चिंता नाही. जनतेला देखील राग येत नाही. ज्या काही माझ्या आतमध्ये ज्या धुमसणाऱ्या गोष्टी आहे, त्या योग्यवेळी मी बाहेर काढेन. ‘इंजिना’ची वाफ योग्य वेळी बाहेर काढेन, मग यांना कसे चटके बसतील बघा, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या