अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले “प्रिय मित्र देवेंद्र...”

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले “प्रिय मित्र देवेंद्र...”

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका असं म्हणत राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com