मनसेची उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द; काय आहे कारण?

मनसेची उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द; काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर आता मनसेकडून संपूर्ण राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यभरात होणारे महाआरतीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच असे ते म्हणाले.

अक्षयतृतीयानिमित्ताने मनसेकडून राज्यभर महाआरतीचे कार्यक्रम करण्यात यावे असे राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबदच्या सभेत सांगितले होते. त्यानुसार उद्या राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाआरती करणार होते. परंतु, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आता मनसेचे महाआरतीचे कार्यक्रम होणार नाहीत.

Related Stories

No stories found.