Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमंदिरे खुले करण्यासाठी मनसेचे आंदोलन

मंदिरे खुले करण्यासाठी मनसेचे आंदोलन

पुणे(प्रतिनिधी)

राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. आज पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसे कडून अभिषेक करण्यात आला आणि गणपती बापाची आरती करण्यात आली.

- Advertisement -

पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे हे कार्यकर्त्यांसह प्रवेश करून, राज्यातील लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याची बुद्धी, या सरकारला देण्याची प्रार्थना गणराया चरणी केली. तसेच यावेळी मंदिरात होमहवन देखील करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरती आणि होमहवन देखील करण्यात आली.

कोरोनाशी लढताना सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल आहे.तर दुसरीकडे हॉटेल आणि दारूची दुकाने सुरु केली, मात्र मंदिर का सुरु करत नाही असा सवाल मनसेने विचारला आहे त्यामुळे मंदिर खुली केली नाहीतर भविष्यात मनसेकडून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या