सावरकरांवरुन वाद पेटला; मनसेसैनिकांचा ताफा पोलिसांनी चिखलीत अडवला

सावरकरांवरुन वाद पेटला; मनसेसैनिकांचा ताफा पोलिसांनी चिखलीत अडवला

चिखली | Chikhali

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप, मनसेसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून राहुल गांधींविरोधात हल्लाबोल केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींना मनसैनिक भारत जोडो यात्रेत काळे झेंडे दाखवणार होते. परंतु, त्याआधीच पोलिसांनी मनसेचा ताफा चिखली येथे अडवला असून धरपकड करत आहेत. यानंतरही मनसे कार्यकर्ते आक्रमक होते. यानंतर शेवटी मनसे नेते नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजपबरोबर मनसे नेत्यांनीही टीका केली आहे. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळीच मनसे कार्यकर्ते काही नेत्यांसह राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या दिशेने निघाले होते.

दरम्यान बुलढाण्यातील चिखली भागात मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अडवलं होतं. यानंतर मनसैनिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. दरम्यान काही वेळानंतर सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com