Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचे आमदार पोहोचले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

शिंदे गटाचे आमदार पोहोचले बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

मुंबई | Mumbai

शिंदे सरकारचा (Shinde Government) मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. शिंदे गटाकडून एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या दादर (Dada) येथील शिवतीर्थ मैदानावर (Shivtirth Ground) वंदन करण्यासाठी कोणताही मंत्री पोहोचला नाही. त्यामुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती….

- Advertisement -

अखेर आज शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod), शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले.

आम्हाला अजूनही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे अजून कामकाज सुरू झाले नाही. मुख्यमंत्री शिंदे हे भर पावसामध्ये शिवतीर्थावर (Shivtirth) आले होते. त्यामुळे आमची निष्ठा ही बाळासाहेबांसोबतच आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) या आमच्याच जिल्ह्याच्या आहे. त्यांनी काय टीका केली, याबद्दल मला काही बोलायचे नाही. त्यांना काही सांगितलं असेल तर आम्ही त्यावर बोलणार नाही, असे प्रत्युत्तर केसरकरांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या