Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभारत बंद हा राजकीय फार्स : आ. विखे

भारत बंद हा राजकीय फार्स : आ. विखे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकराने लागू केलेल्या कृषी विधेयकाला राजकीय हेतूने होत असलेला विरोध म्हणजे शेतकर्‍यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

विरोधकांचा भारत बंद केवळ राजकीय फार्स असून ,केंद्र सरकारच्या समर्थनासाठी शेतकर्‍यांनीच आता रस्त्यावर उतरावे,असे आवाहन माजी कृषी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आ. विखे पाटील यांनी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदवर सडकून टीका केली. काही पक्षांच्यावतीने आयोजित केलेला बंद केवळ राजकीय हेतूने प्रेरीत असल्याकडे लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, ज्यांनी मॉडेल अ‍ॅक्ट देशात आणला तेच आता या कृषी विधेयकाला विरोध करीत असल्याचे आश्चर्य वाटते.

राज्यात आम्ही सत्तेत असताना आम्हालाही या मॉडेल अ‍ॅक्टचे समर्थन करण्यास सांगण्यात आले. कृषी क्षेत्रातील या तरतुदी आता कायद्याच्या माध्यमातून लागू करण्यात आल्यानंतर त्याला आता विरोध का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे हे देशातील शेतकर्‍यांना स्वातंत्र्य मिळवून देणारे आहेत. परंतु या कायद्याला विरोध म्हणजे शेतकर्‍यांना दिलेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.

नविन कृषी धोरणामुळे देशातील शेतकरी आत्मनिर्भरतेने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच भारत बंदला शेतकर्‍यांनीच विरोध करून केंद्र सरकारच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन आ. विखे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या