खडसे नंतर आता आ.संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

चर्चेला उधान, बॅनरवरून महाजनांचा फोटो गायब
वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये खडसेंचा फोटो
वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये खडसेंचा फोटो

जळगाव - Jalgaon

भारतीय जनता पार्टीमधून नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या नंतर आता आ.संजय सावकारेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? या चर्चेला उधान आले आहे.

खडसेंच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलण्याचा अंदाज वर्तवला जात असतानांच भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने व काही फलकांवरून माजीमंत्री आ.गिरीश महाजन यांचा फोटो गायब झाल्याने आता सावकारेही राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे बोलले जात आहे.

आमदार संजय सावकारेंचा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून भुसावळ शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावरुन, तसेच वृत्तपत्रांना दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीत भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत.

सोशल मीडियावरील अनेक जाहिरातींमध्ये सावकारेंसोबत एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे,भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचे छायाचित्रे आहेत.

तर भाजपच्या नेत्यांसह गिरीश महाजन यांचेही छायाचित्र जाहिरातींमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

श्री.सावकारे यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आणले होते. एकनाथ खडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसेंच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून आपल्या पदाची टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच खडसेंचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार संजय सावकारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com