Saturday, April 27, 2024
Homeराजकीयपार्थ पवारांचा विषय हा आमच्या घरातील

पार्थ पवारांचा विषय हा आमच्या घरातील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पार्थ पवार यांचे वक्तव्य आणि त्यावर शरद पवार यांनी दिलेली प्रक्रिया हा विषय आमच्या कुटुंबातील आहे. यात अन्य कुणी पडण्याचे कारण नाही, असे सांगत पार्थच्या विषयावर बोलण्यापेक्षा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला.

- Advertisement -

राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी आजच माझ्या कानावर आली आहे. त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचे कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी केला.

शुक्रवारी कर्जत-जामखेडचे आमदार व शरद पवार यांचे नातू आ. पवार आज पोलीस अधीक्षक कार्यलयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीसाठी आले होते. यावेळी शरद पवार यांनी पार्थबाबत केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता, हा विषय आमच्या कुटुंबातील असल्याचे नमूद करत अन्य कुणी यात पडण्याचे कारण नाही.

पार्थ पवार हा विषय आमच्या घरातील आहे. त्यावर बोलण्यापेक्षा सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला, असे आ. रोहित पवार म्हणाले.

सुशांतसिंह प्रकरणात राजकारण केलं जात आहे, असे मी सुरुवातीपासूनच बोलत आहे आणि आता ते म्हणणे हळूहळू खरे होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, अशी बातमी आजच माझ्या कानावर आली आहे.

त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे, हे सुद्धा स्पष्ट होऊ लागलं आहे. याला बिहार निवडणुकीचे कनेक्शन आहे, असे नमूद करत आ. रोहित पवार यांनी या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. सुशांतला न्याय मिळायला हवा, असे आम्हालाही वाटते आहे. त्यामुळे यावर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या