Thursday, May 2, 2024
Homeराजकीयआ.रोहित पवार म्हणाले भाजप नेत्यांना 'साष्टांग दंडवत'

आ.रोहित पवार म्हणाले भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’

मुंबई | Mumbai

आज सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला (sushant case handed over to cbi). मुंबई पोलिसांसह (mumbai police) महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (ncp mla rohit pawar) यांनी भाजप नेत्यावर (bjp leader)

- Advertisement -

कठोर टीका केली आहे. भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केले म्हणत त्यांनी कठोर शब्दात रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, “सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’. आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.”

SSR : ना बिहारचा विजय असून ना महाराष्ट्राचा पराभव

- Advertisment -

ताज्या बातम्या