Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याधमकी सत्र सुरुच! भुजबळ, मुंडेंनंतर आता रवी राणांना जीवे मारण्याची धमकी

धमकी सत्र सुरुच! भुजबळ, मुंडेंनंतर आता रवी राणांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे (Amravati) अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना देखील जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवी राणा यांच्‍या मोबाईलवर संभाजीनगर येथील एका व्‍यक्‍तीने संपर्क साधला. महाराष्‍ट्रात फिरणे बंद करा, अन्‍यथा तुमच्‍या जिवाचे बरेवाईट करू, अचानक काही घडले किंवा अपघात झाला, तर काही म्‍हणू नका. तुमच्‍यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्‍ला करणार आहेत. तुम्‍हाला आम्‍ही सोडणार नाही. आमच्‍या विरोधात कसे काय बोलता, हे आम्‍ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्‍हाला संपवून टाकू, अशा धमक्‍या दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या