स्वा. शे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

स्वा. शे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

मुंबई | Mumbai

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

काही दिवसांपासून राजू शेट्टी (Raju Shetty) आणि देवेंद्र भुयार यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात होते. यावर आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा आरोप करत संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवला.

स्वा. शे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनं CSK चं कर्णधारपद सोडलं, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) केली आहे. “धन्यवाद’ अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे. देवेंद्र भुयार यांनी धन्यवाद अशा आशयाचा स्टेटस अनेक सोशल मीडियावर ठेवला आहे.

स्वा. शे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी, भुयार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स... काय आहे प्रकरण?

देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी टीका करताना म्हणाले, ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला. भुयार यांची पक्षातून हकालपट्टी होताच, त्यांनी धन्यवाद अशा आशयाची फेसबुक पोस्ट केली आहे. अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होत नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे शेट्टी म्हणाले.

Related Stories

No stories found.