Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“एक तारखेला ट्रेलर, चित्रपट १५ दिवसांत”; बच्चू कडूंचा थेट इशारा

“एक तारखेला ट्रेलर, चित्रपट १५ दिवसांत”; बच्चू कडूंचा थेट इशारा

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे गटातील आमदार बच्चू कडू सध्या चांगलेच संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा यांच्याकडून कडू यांच्यावर बेछूट आरोप सुरु आहेत.

- Advertisement -

बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. याविरोधात दाद मागूनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी, ”एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल” असं वक्तव्य करत थेट इशाराच दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बच्चू कडू यांनी म्हटलंय कि, ‘हा वाद माझ्यापुरता मर्यादीत नाही. पैसे देऊन सरकार स्थापन झाले का? मग मला पैसे कुणी दिले? सर्व आमदारांनी अडचणीत आणणारे हे आरोप आहेत. आ. रवी राणा यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, त्यामुळे हे आरोप कायमचे मिटले पाहिजेत. तसेच खासदार नवनित राणा यांना गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी- काँग्रेसने पाठिंबा दिला. मग तोही पैसे देऊन केला का?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.

तसेच ‘मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. आम्हाला राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत आम्ही. आम्ही घालून टाकू नांगर’, अशा शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.

त्याच बरोबर ‘एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार. कसं षडयंत्र रचलं जातं ते सगळं समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल’, असा सूचक इशारा बच्चू कडूंनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या