
मुंबई | Mumbai
अजित पवार (Ajit Pawar) भेटीवर स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय संभ्रम दूर केला असला तरी, दोघांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात अद्याप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या भेटीवर आता आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या भेटीवरून राजकारणाच्या पुढच्या दिशेबाबत भाकित केले आहे.
अजित पवारांसोबत शरद पवारही येतील आणि महायुती आणखी मजबूत करतील, असे कडू म्हणाले. बच्चू कडू म्हणाले की, शरद पवारांचे बोलण आणि त्यांची कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही ते करतात. मात्र, ही भेट गुप्त नव्हती, असे स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केले असून, राजकीय वर्तुळात निर्माण झालेले संभ्रमाचे वादळ दूर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या भेटीवरून बच्चू कडू यांनी वेगळेच समीकरण मांडले आहे.
बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार यांनी प्रचंड राजकीय अनुभव आहे. त्यामुळे काय समजावे हेच समजत नाही. राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमात दिसत आहे. राष्ट्रवादीत अनिश्चितता आहे. पिक्चरमध्ये कोणी येत नाही. अजित पवार बाहेर पडल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे होता, तो दिसत नाही. अजित पवारांच्या बॅनरवर पवारांचे फोटो वापरले जाताच. या सगळ्या परिस्थितीमध्ये संभ्रम दिसत आहे.
दरम्यान शरद पवारांच्या कृती न समजणाऱ्या आहेत. मात्र सध्याच्या घडामोडींवरून शरद पवार देखील अजित पवारांसोबत येऊन महायुती मजबूत करतील, असा अंदाजही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.