Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याMission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर... नव्या चर्चांना उधाण

Mission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर… नव्या चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी मंगळवारी (१८ एप्रिल) संपूर्ण दिवसभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. पण दुपारी खुद्द अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्णविराम दिला.

- Advertisement -

या सर्व गदारोळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मात्र कुठेच दिसले नाही. यातच यांनी देवेंद्र फडणवीस चार ओळीचं एक ट्विट केलं आहे, ज्यामुळं आता नव्या चर्चांना उधान आलं आहे. फडणवीस यांच्या ट्विटमुळे सरकार राहणार की जाणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा कार्यालयात काम करतानाचा फोटो ट्विट केला आहे.या फोटोमध्ये त्यांच्यासमोर टेबलवर फायलींचा मोठा गठ्ठाच दिसत आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, ‘Mission #NoPendency ! Office work. Clearing pendencies..कार्यालयीन कामकाज..” यामुळे एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

दरम्यान, अजित पवारांच्या गोटात होत असलेल्या सर्व घडामोडींवर ते बारीक लक्ष ठेवून होते. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. अजित पवारांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचे खंडण केल्यानंतर या चर्चा आता थंड झाल्या होत्या.

राज्यात भाजपला २०२४ मध्ये सुरुंग? ‘त्या’ अहवालाबद्दल विनोद तावडेंचं सूचक ट्वीट

मात्र, तोच देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट करुन राजकीय चर्चांना पुन्हा हवा दिली आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निकाल आता केव्हाही लागू शकतो. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या हे ट्विट महत्वाचे मानलं जात आहे.

…तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अजित पवारांच्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांचं मोठं विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या