मिशन नाशिक मनपा : महिला उमेदवारांची चाचपणी - दीक्षा दीपक लोंढे (रिपाइं)

मिशन नाशिक मनपा : महिला उमेदवारांची चाचपणी - दीक्षा दीपक लोंढे (रिपाइं)

सातपूर | रवींद्र केडिया Satpur

रिपाइं ( RPI ) नेहमी महिलांच्या प्रश्नांवर अग्रेसर ( Leading on women's issues )राहत असते. निवडणुकांच्या वातावरणात महिलांना 50 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगराचा आढावा घेतला तर बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. बहुजन समाजाचे मत हे निर्णायक मतदान राहणार असल्याने व महिलांच्या आरक्षणाचे बंधन असल्याने रिपाइंदेखील महिलांना प्रोत्साहन देणार आहे. पक्षाच्या महिला उमेदवारांची चाचपणी केली जात असून जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याबाबत लक्ष ठेवून असल्याचे नगरसेविका दीक्षा लोंढे ( Corporator Diksha Londhe )यांनी सांगितले.

प्रश्न : निवडणुकीची तयारी करताना स्वबळावर की युतीच्या माध्यमातून लढणार?

उत्तर : आमच्या बहुजन समाजाचे मतदान प्रत्येक प्रभागात 4 ते 5 हजार विभागलेले आहे. त्यामुळेे रिपाइंचे मतदान हे निर्णायक राहणार आहे. आमची तयारी सुरू झालेली आहे. आम्हाला सन्मानजनक तोडगा दिला तर सोबत अन्यथा स्वबळावर लढण्याची पक्षाच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

प्रश्न : शहरात अत्याचार वाढतोय, बेरोजगारी वाढतेय. या पार्श्वभूमीवर शहरातील महिलांसाठी आपण काय करतो?

उत्तर : महिला या सुसंस्कृत बनत आहेत. समाजात चांगले स्थान निर्माण करत आहेत. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासोबत काम करताना अनेक ठिकाणी महिलांवरील अन्याय-अत्याचारावर न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम केले आहे. महिला नगरसेवक असल्याने महिला मैत्रिणीप्रमाणे समस्या मांंडतात.

घरातील कौटुंबिक समस्यादेखील मांडतात. कुटुंबातील दोघांना समजावून सांगितले तर ते ऐकतात. समस्या तेथेच सुटतात. प्रभागात बचतगट स्थापून रोजगार निर्मिती करून दिली आहे. या बचत गटांना कर्ज मिळण्यासाठी त्यांना सातत्याने पाठबळ उपलब्ध करून स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. महिलांना संघटित करण्यासाठी सातत्याने मेळाव्यांचे आयोजन केले जाते. महिलांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण देत असतो. अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम रिपाइंने प्रभागात उभे केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com