Modi cabinet expansion : संजय धोत्रे यांच्यासह केंद्रातील 'या' मंत्र्यांचा राजीनामा

Modi cabinet expansion : संजय धोत्रे यांच्यासह केंद्रातील 'या' मंत्र्यांचा राजीनामा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायळा मिळणार आहेत. जवळपास ४३ मंत्री आज सायंकाळी पदाची शपथ घेणार आहेत. या समारंभापूर्वीच अनेक मंत्र्यांनी राजीनामे देण्यात सुरुवात केलीये.

यात केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे, संतोष गंगवार, केंद्रीय शिक्षणमंतत्री रमेश पोखरियाल निशंक आणि महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा हेही राजीनामा देतील, असं बोललं जातं आहे. गौडा हे कर्नाटकचे आहेत. त्यांच्या जागी शोभा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com