
दिल्ली | Delhi
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले हे त्यांच्या विनोदी कविता आणि शायरींसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या या विनोदी कविता संसदेत वारंवार वाचताना पाहायला मिळतात. रामदास आठवले यांनी सोमवारी दिल्ली सेवा विधेयकाचे समर्थन करत विरोधकांवर निशाणा साधणारी कविता त्यांच्या शैलीत ऐकवली, जी ऐकून राज्यसभेत उपस्थित असलेले बहुतांश नेते हसू लागले. रामदास आठवले यांनी आपल्या काव्यात्मक शैलीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर टीका केली.
रामदास आठवले म्हणाले, “दिल्लीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मग काँग्रेसवाले आम आदमी पक्षाला कशासाठी समर्थन देत आहेत? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं. त्यात अरविंद केजरीवाल होते, याचा आम्हाला आदर आहे.”
अमित भाईंका इतना अच्छा आ गया हे बिल,
लेकीन सामने वालों को हो रहा है फील.
नरेंद्र मोदीजीं के पास है, बहुत अच्छी वील,
लेकीन दिल्ली मे हो रही है, दारू के ठेके की डील.
नरेंद्र मोदी और अमित शाह की, अच्छ जम गई जोडी,
फिर काँग्रेस और आपवालों की, कैसे आगे जाएडी गाडी.
नरेंद्र मोदीजी जानते है, जनता की नाडी,
इसलिए बढाई है, मैंने अपनी दाढी.