नवाब मलिकांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळली
नवाब मलिकराजकीय

नवाब मलिकांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ED) २३ फेब्रुवारीला अटक केली होती.

मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नबाव मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना मोठा झटका बसला आहे.

दरम्यान नवाब मलिक (Nawab Malik) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार होती. पण, आज विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना पुन्हा ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.