‘कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही’

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी म्हंटले आहे कि, “कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही आणि झोपला तरी सकाळ होण्याचे थांबत नाही अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झालीय. कोंबड्याला वाटत मी आरवलो नाही तर सकाळ होणार नाही. पण, तसे होत नाही. कोंबडा झोपला तरी सकाळ होते हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवे’ तसेच शरद पवार असतील किंवा इतर मंत्री शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना धीर देण्यासाठी शेताच्या बांधावर जावून धीर देणे ही आमच्या पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.” असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

सरकार लवकरच मदत जाहीर करेल

कुठल्याही शेतकऱ्याला या अडचणीच्या काळात अडचणीत राहू देणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकार घेणार आहे. येत्या कॅबिनेटच्या बैठकीत सरकार निश्चितरूपाने मदत जाहीर केली जाईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय मुख्यमंत्री हेसुद्धा दौऱ्यावर आहेत.ते दौऱ्याहून परत आल्यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे भरपाई देण्याची भूमिका असेल. त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर केंद्राचीही मदत करण्याची जबाबदारी असल्याचेही नवाब मलिक यांनी नमूद केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *