वादळ येणार अन् राज्यातील आघाडी सरकार जूनमध्ये कोसळणार; नारायण राणेंनी वर्तवलं भाकीत

वादळ येणार अन् राज्यातील आघाडी सरकार जूनमध्ये कोसळणार; नारायण राणेंनी वर्तवलं भाकीत

वाशिम | Washim

महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळणार असल्याचं भाजप नेते वारंवार बोलत असतात.

त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार जून महिन्यात कोसळणार असल्याचं भाकीत नारायण राणेंनी वर्तवलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वाशिम दौऱ्यावर होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

कोकण किणारपट्टीमध्ये जूनमध्ये वादळसदृश परिस्थिती असते. वादळ आलं की झाडं फांद्यासह कोसळतात. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी हे एक फांद्यांचं झाड आहे. झाडाच्या एका फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते मुख्य खोड नाहीत. त्यामुळं हे सरकार जूनमध्ये पडणार असं भाकीत नारायण राणेंनी वर्तवलं आहे.

Related Stories

No stories found.