तेवढे व्हाईट पैसे आहेत का ?

चंद्रकांत पाटलांचा हसन मुश्रीफ यांना खोचक सवाल
तेवढे व्हाईट पैसे आहेत का ?

पुणे |प्रतिनिधी| Pune

मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) यांच्यावर पलटवार केला आहे. हसन मुश्रीफ (Minister Hassan Mushrif) सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) १०० कोटींचा दावा ठोकणार म्हणतात पण ही त्यांची कार्यपद्धती आहे. अलिकडच्या काळात इतके घोटाळे समोर येत आहेत की १०० कोटींचा दावा ही फार छोटी रक्कम आहे. त्यांनी जरा ५००, १००० कोटी रुपयांचा दावा ठोकला पाहिजे. शिवाय अब्रू नुकसानीचा दावा (Defamation claim) करायला कोर्टात स्टॅम्पसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. तेवढे व्हाईट पैसे आहेत का? खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. ब्लॅक मनी (Black Money) तिथे चालत नाही. मग हा पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार, हेही त्यांनी सांगावं”, असा टोलाही त्यांनी लागवला.

भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफांवर (Minister Hassan Mushrif) केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांवर (BJP leader Kirit Somaiya) 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा (Hint) त्यांनी दिला आहे. तसंच चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत (Hybrid Annuity Road Scams) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी मुश्रीफांना खोचक सवाल केलाय. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.

हॅब्रीड अन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? घोटाळा आहे असं जर मुश्रीफांचं म्हणणं आहे, तर १९ महिने काय तुम्ही झोपा काढत होतात का? आत्ता तुम्हाला जाग आली का? त्यांना हॅमविषयी तक्रार करायची असेल, तर काही अडचण नाही. १९ महिन्यांत करण्यासारखं खूप होतं. कोविडमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरं काम नव्हतं. त्या काळात हे करता आलं असतं”, असं देखील पाटील म्हणाले.

मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. त्यांचं सरकार येऊन 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही, असा दावाही पाटील केला.

“सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणतात. यात कसला प्रयत्न? तुम्ही खूप खमके आहात ना. तुम्ही एकमेकांना असा फेविकॉल लावलाय की तो हलवण्याची कुणाची हिंमत नाही. रोज जयंत पाटील, सुप्रिया सुळे म्हणतात की २५ वर्ष हे सरकार टिकणार आहे. मग घाबरण्याचं कारण नाही”, असेही पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com