Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याHasan Mushrif on Rohit Pawar : "रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे";...

Hasan Mushrif on Rohit Pawar : “रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे”; मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची येवला, बीडनंतर शुक्रवारी म्हणजे उद्या (दि.२५) रोजी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सभा होणार आहे. या सभेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) हे कोल्हापूरात तळ ठोकून आहेत. यावेळी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाचे आमदार आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.

- Advertisement -

Nashik Crime News : नाशकात दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्याचा खून

रोहित पवार म्हणाले होते की, १९९८ मध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत, असं रोहित पवारांनी म्हटले होते. त्यानंतर आता पवारांच्या या विधानाला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray : “मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो, पण…”; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

यावेळी बोलतांना मुश्रीफ म्हणाले की, रोहित पवार नवखे आहेत. त्यांना तिकडे अजित पवारांची (Ajit Pawar) जागा घ्यायची आहे. ते कशासाठी एवढे धाडस करत आहेत. कोल्हापुरात सहा आमदार (MLA) होते आता कमी झाले. पुण्यात देखील अशी परीस्थिती झाली आहे. आरोप करायला जागा नसल्याने ते असे बारके आरोप करतात. तसेच मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता हे जाहीरपणे सांगावे. मंडलिक साहेब तर माझे नेते होते, त्यांचा मला विरोध नव्हता. मग कुणाचा विरोध होता, हे त्यांनी जाहीरपणे सांगावे. शरद पवार यांच्यामुळे आम्हाला राजकारणात स्थान मिळाले, हे आम्ही कधी नाकारणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.

Actress Seema Dev : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

पुढे बोलतांना ते म्हणाले की, शरद पवार यांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या दसरा मैदानात जास्तीत जास्त पाच हजार लोक बसू शकतील. पवारांची सभा ऐकायला सांगली, इस्लामपूरमधून लोक येणार. साहेब काय बोलतात, हे बघायला येणार. काही आमची माणसं ऐकायला जाणार. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी, या आमच्या शुभेच्छा आहेत, असेही हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : कांद्याचे लिलाव बंद पाडत शेतकरी उतरले रस्त्यावर; महामार्ग रोखला, पोलिसांकडून धरपकड

- Advertisment -

ताज्या बातम्या