
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने भेट घडून आली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली तेव्हा दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अजित पवार दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती...
त्यानंतर अजित पवारांची काल पुन्हा शरद पवारांसोबत भेट घडून आली. त्यामुळे या भेटीगाठींवर चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर भाष्य करतांना मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी अजित पवारांना धूर्त राजकारणी म्हटले आहे. त्यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की. अजितदादा हे धूर्त राजकारणी आहेत, पोटात एक आणि ओठावर एक हे मला माहित नाही. परंतु दादा हे धूर्त राजकारणी आहेत; म्हणून तर ते इतके वर्ष राजकारणामध्ये टिकून आहेत. आतासुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते बाहेर पडले. यावेळेला त्यांच्यासोबत ५४ आमदारांपैकी ४२ आमदार (MLA) आहेत. त्यामुळे याबाबत दुमत असल्याचे कारणच नाही. ते धूर्त राजकारणी आहेतच", असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
दरम्यान, दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी देखील अजित पवारांना डिवचले असून अजित दादा हे धूर्त राजकारणी असल्याचे म्हणत त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असे विधान केले आहे. त्यामुळे आता अजित पवार गटात आणि भाजपमध्ये (BJP) यावरून वाद होण्याची शक्यता आहे.