Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस

मुंबई | Mumbai

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drug Case) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंत्री भुसे आणि देसाई यांनी अंधारे यांचे हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच अंधारे यांच्यावर बदनामी केल्यासंदर्भात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे मंत्री भुसे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मंत्री दादा भुसे यांनी विविध वर्तमानपत्रांचा दाखला देत सुषमा अंधारे यांना ड्रग्ज प्रकरणी बदनामी केल्याप्रकरणी वकीलांमार्फत नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे....

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस
मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

मंत्री दादा भुसे यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये (Notice) म्हटले आहे की, सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणात माझी बदनामी केली असून त्यांनी याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी, असा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे. तसेच नोटीसीला उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा देखील भुसे यांनी दिला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या पाठोपाठ सुषमा अंधारे यांच्यावर मंत्री दादा भुसे मानहानीचा (Defamation) दावा दाखल करणार असल्याचे दिसत आहे.

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस
Accident News : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात सुरुवातीला सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केले होते. यानंतर भुसे यांनी देखील कोणत्याही चौकशीला समोर जाण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे ठाकर गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील मंत्री भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात आरोप केले होते. यानंतर भुसे यांनी मालेगाव कोर्टात (Malegaon Court) खटला दाखल केला होता. त्यासंदर्भात कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. नुकतीच काल याप्रकरणाची सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीस खासदार संजय राऊत गैरहजर होते. त्यानंतर आता ड्रग्ज प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेतल्यामुळे सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना शुभेच्छा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com