आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान

मुंबई | Mumbai

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे पाहून म्याव म्याव आवाज काढून डिवचलं. यानंतर याचे पडसाद अधिवेशनातही उमटल्याचं पहायला मिळालं.

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरुन याआधीही विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनीही हे बरोबर नसल्याचे म्हटले होते. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आक्रमकपणे याबाबत विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या बोलत दालनात सभासदांचे वर्तन याबाबत बैठक घेण्यात आली. सभासद त्यांनतर वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरुनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आपली भूमिका मांडली.

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान
VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या

मतदारसंघातील लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री, कोंबड्या आणि मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही, याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तुम्ही सभागृहात प्राण्यांचे आवाज काढता तेव्हा तो या मतदारांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता ते पाहून मतदारांना काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी करावा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

यावेळी अजित पवार यांनी काही सदस्यांकडून कसं वर्तन केलं जातं हेसुद्धा सांगितलं. अजित पवार म्हणाले की, आम्ही आमदार झालो तेव्हा अध्यक्षांचा, मंत्र्यांचा किती दरारा होता. कोणी आलं तर त्यांना सभागृहात मान दिला जायचा. पण आता कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं. इथेही येऊन बसतात. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा, तुला बसायचं आहे तर पाठिमागे बस. कॅबिनेट मंत्र्यांच्या मागे आम्ही बसायचो, आता एक पत्र झालं की दुसरं द्यायला येतात. एकदाच काय ते द्या असंही अजित पवार यांनी म्हटलं.

आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
आपण कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं प्रतिनिधित्व करत नाही; अजित पवारांनी टोचले कान
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com