Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांच्या निवासस्थानी आज बैठक; ...यांची असणार उपस्थिती

शरद पवारांच्या निवासस्थानी आज बैठक; …यांची असणार उपस्थिती

दिल्ली | Delhi

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची आज विरोधी पक्षातील नेत्यांसोबत महत्वूर्ण बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी ४.०० वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

या बैठकीत आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉफ्रेंस आणि एनसीपी व्यतिरिक्त काही पक्षांची नेतेमंडळी उपस्थितीत राहणर आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्याद्वारे सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा दिशेने खुप महत्वपूर्ण मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या बैठकीमध्ये बैठकीमध्ये यशवंत सिन्हा, पवन वर्मा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, भाकप सरचिटणीस डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, न्या. ए. पी. शाह, जावेद अख्तर यासोबतच आशुतोष, माजिद मेमन, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंह, सुधींद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी, ‘राजद’चे मनोज झा यांच्यासह काँग्रेसचे खासदार के. टी. एस. तुलसी आणि काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी प्रवक्ते संजय झा यांचा समावेश असेल.

बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?

दरम्यान या बैठकीचं निमंत्रण शिवसेनेला देण्यात आलेलं नाही. मंत्री नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत शिवसेनेच्या नेत्याचं नाव निमंत्रितांच्या यादीत नाहीये. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, रजकिय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा भेट झाली होती. विरोधी पक्षासोबत बैठक करण्यापूर्वी शरद पवार दिल्लीत एनसीपीच्या राष्ट्रीय कार्यसमिती सोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध अजेंडावर चर्चा केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या