१ जूनला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
१ जूनला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

मुंबई । प्रतिनिधी

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार परवा, बुधवारपासून पुन्हा दैनंदिन कामात सक्रिय झाले असून त्यांनी येत्या १ जून रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी दिली.

पक्षाध्यक्ष पवार यांनी सक्रीय कामाला सुरुवात केल्यामुळे पक्षाला आणखी उभारी आणि ताकदही मिळेल, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने ते कामाला सुरुवात करणार आहेत, असेही मलिक म्हणाले.

दरम्यान, खासदाद छत्रपती संभाजीराजे यांनी आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com