ईडीच्या धाडी, भाजपच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज बैठक

ईडीच्या धाडी, भाजपच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज बैठक
शरद पवार

मुंबई / प्रतिनिधी
राष्ट्रवादी (ncp)काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. सह्यादी या शासकीय अतिथीगृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ईडीच्या धाडी, भाजपच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक महत्वाची आहे.

 शरद पवार
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बैठकीची माहिती दिली. बैठकीत पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्या कामाची तसेच जिल्ह्यजिल्ह्यातील कामाच्या संदर्भात आढावा घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ढवळून निघालेले राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्ष भाजपने चालवलेले आंदोलन आदींबाबत आजच्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com