Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहसूल मंत्री थोरात आणि शिवाजी कर्डिले यांची भेट

महसूल मंत्री थोरात आणि शिवाजी कर्डिले यांची भेट

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता

- Advertisement -

जिल्हा शासकीय विश्रामगृहावर भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. ही भेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँक: मंत्री शंकरराव गडाख बिनविरोध

दरम्यान, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजे. सहकार क्षेत्रात काम करत असताना राजकीय पक्ष विरहित काम करावे लागते. त्यामुळे जिल्हा बँकेसाठी ही आम्ही कुठलेही राजकारण न करता सहमतीने निवडणूक कशी पार पाडता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक तालुक्यांमध्ये बँकेचे निवडणुकीसाठी मेळ घालण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये बर्‍यापैकी यश आले असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या