महापौर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नगरविकास मंत्र्यांसोबत 100 कोटींच्या निधीबाबत चर्चा
महापौर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव शहराच्या विकासासाठी महापौर, उपमहापौरांनी सोमवारी सायंकाळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेवून 100 कोटींची मागणी केली. यावेळी ना.शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले. दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

जळगाव महापालिकेत भाजपच्या 27 बंडखोरांच्या माध्यमातून शिवसेनेने सत्ता आपल्या हाती घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील पून्हा काही नगरसेवक फोडाफोडीची रणनिती सुरु आहे. दोन दिवसांपुर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे.

आणखी सात ते दहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. गेल्या चार दिवसांपासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे मुंबईत ठाण मांडून आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी महापौर जयश्री महाजन, सुनील महाजन, ललित कोल्हे, सरीता माळी-कोल्हे, मुंबईला गेले असून, त्यांनी शनिवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून विकास कामांच्या निधीबाबत चर्चा केली. तसेच भाजपातील काही नगरसेवक येण्यास इच्छूक असल्याबाबतची चर्चा करण्यात आली असल्याचे समजते.

नगरविकास मंत्र्यांनी दिली सर्वांगिण विकाची ग्वाही

महापौर जयश्री महाजन यांनी शहराच्या विकासासह गाळ्यांच्या प्रलंबित विषयावर चर्चा केली. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासाची ग्वाही दिली. तसेच प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईला येण्याबाबत सांगितले. याप्रसंगी ना. शिंदे यांनी आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला.

काही नगरसेवक वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत

भाजपातील सात ते दहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काही नगरसेवक दोन दिवसांपुर्वी मुंबईला रवाना झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे रविवारी आणि सोमवारी भेटीची शक्यता कमी असल्याने धुळ्यापर्यंत पोहचलेले नगरसेवक माघारी परतले असून वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. कोणत्याही क्षणी मुंबईहून निरोप येताच भाजपचे काही नगरसेवक रवाना होणार असल्याचे वृत्त आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com