मायावती
मायावती
राजकीय

मायावतींचा अशोक गेहलोतांवर गंभीर आरोप

राजस्थानामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केली मागणी

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

आज मायावतींनी ट्विट करत म्हंटले आहे की, " राजस्थानचे मुख्यमंत्री श्री. गेहलोत यांनी पहिले पक्ष-बदल कायद्याचे उल्लंघन व बसपासोबत सलग दुसऱ्यांदा पक्षातील आमदारांना काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहे. आणि फोन टॅप करून बेकायदेशीर आणी असंवैधानिक कृत्य केले आहे. तसेच राजस्थानातील सततची राजकीय कोंडी, आप आपसातील गोंधळ आणि अस्थिर सरकार या परिस्थितीची दखल घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी कारण लोकशाहीची अजून दुर्दशा होऊ नये."

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com