...तेव्हा नारायण राणे, दानवे गप्प का?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा

...तेव्हा नारायण राणे, दानवे गप्प का?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा

दिल्ली | Delhi

मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) १२७ व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक (127th Constitution Amendment Bill) चर्चेनंतर संसदेत (Parlament) बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२१ विधेयकावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ ३८५ मते पडले, विरोधात एकही मत पडले नाही. आता बुधवारी हे विधेयक राज्यसभेत (Rajya Sabha) मांडले जाईल.

मात्र, या विधयकावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shevsena MP Sanjay Raut) यांनी भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) व रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊतांनी संसदेत ज्यावेळी विधेयकावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राणे व दानवे दोघे गप्प का राहिले? ते का बोलले नाहीत? असा सवाल केला आहे.

...तेव्हा नारायण राणे, दानवे गप्प का?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा
Video : 'आम्ही राष्ट्रवादीला कधीही बुडवू'; भुजबळांचा संदर्भ घेत सेना खासदाराचे विधान

संजय राऊत म्हणाले की, 'सरकारने हा तिढा कायम ठेवला आहे. ५० टक्क्यांची मर्यादा जो पर्यंत उठवली जात नाही तोपर्यंच राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. लोकसभेतल्या सर्व खासदारांनी हिच मागणी केली आहे. मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? जे एकत्र येऊन आंदोलन करत होते त्यांनी या ५० टक्क्यांवर बोलायला हवं होतं.'

तसेच, 'आतापर्यंत लाखों लोकांनी यासाठी मोर्चे काढले. अनेकांनी आपले प्राण गमावले. हे सर्व चाललंय तो केंद्र सरकारला खेळ वाटतोय का. आम्ही या विधेयकाला समर्थन देतोय. यामध्ये आम्हाला कोणताही अडथळा आणायचा नाही. पण आमची अपेक्षा आहे की सरकारने संवेदनशीलता दाखवून ५० टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी,' असही राऊत म्हणाले.

दारुच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने...

दरम्यान संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयात सापडलेल्या दारुच्या बाटल्यांच्या (Liquor Bottles found in Mantralaya) मुद्द्यावरून भाजपला (BJP) फैलावर घेतलं आहे. त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात. भाजपने या बाटल्या लॅबमध्ये नेऊन तपासाव्यात. त्या किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com