मराठा आरक्षण : संभाजीराजे उद्या पुण्यात घेणार उदयनराजेंची भेट

मराठा आरक्षण : संभाजीराजे उद्या पुण्यात घेणार उदयनराजेंची भेट

पुणे (प्रतिनिधि) - मराठा आरक्षण मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 16 जूनला पहिला मराठा मोर्चा काढण्याचे जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या (शुक्रवार) खासदार संभाजीराजे छत्रपती हे खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.पुण्यात उद्या दुपारी 12 वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा मोर्चाची रुपरेषा मांडली. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com