Maratha Reservation : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड, दोघे ताब्यात

Maratha Reservation : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड, दोघे ताब्यात

मुंबई | Mumbai

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Medical Education Minister Hasan Mushrif) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात व्यक्तींच्या वतीनं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवास इथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करून गाडी फोडण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. मंत्रालयातही येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांना आत सोडलं जात आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत, त्या मरिन लाईन्स पोलीस स्थानकात नेण्यात आल्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com