Thursday, April 25, 2024
HomeराजकीयMaratha Reservation : अकोलेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा

Maratha Reservation : अकोलेत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा

अकोले | प्रतिनिधी | Akole

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी अकोलेत आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

विशेषतः या मोर्चात माजी मंत्री मधुकरराव पिचड, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, आमदार डॉ किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, मराठा शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे,बी जे देशमुख, जालिंदर वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ,कॉ. कारभारी उगले,कॉ.अजित नवले, कैलासराव वाकचौरे, विनय सावंत, हभप दीपक महाराज देशमुख, महेशराव नवले, बाळासाहेब भोर, भानुदास गायकर, संगीता शेटे, रेश्मा डावरे आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

महात्मा फुले चौका पासून मोर्चास प्रारंभ होऊन मोर्चा बाजार तळावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आहेत. मोर्चाला मराठा समाजा व्यतिरिक्त विविध समाजातील नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत.

हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी व्यासपीठावर बसण्याऐवजी समोर उपस्थितांत बसणे पसंत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या