
जालना | Jalana
मराठा आरक्षणावरुन (maratha aarakshan) राज्यात आंदोलन पेटले आहे. एकीकडे राज्य सरकारने कुणबी पुरावे असलेल्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा जीआर काढलाय. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशन बोलवून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली आहे. मात्र आता आरक्षण मिळाल्याशिवाय इथून उठणार नाही. उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील बोलले. मनोज जरांगे पाटील यांना याबद्दल विचारण्यात आले. “इंटरनेट बंद केल्यावर लोकांचा रोष वाढणारच. आंदोलन खूप मोठ झालय.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा. हे निर्णय लवकर घ्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.”मी, माझा मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. पूर्ण आरक्षणच हवे. अर्धवट आरक्षण नको. अर्धवट आरक्षण नाही घेणार. नेट बंद करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. पण नेटपेक्षापण मराठा समाज हुशार झालाय. काल रात्रीच हजारो लोक महाराष्ट्रातून इथे येऊन बसलेत. अशी काम करुन राज्यातील वातवरण दूषित करु नका. अर्धवट दिलेले आरक्षण घेणार नाही” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
काही कारस्थान दिसतय का? आंदोलन चिघळवायचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ते मला उठवू शकत नाहीत. त्यांचा डाव १०० टक्के दिसतोय. आंदोलन खूप मोठ झालय. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही” “उद्रेक आमच्याकडून होणार नाही. शांततेत आंदोलन सुरु राहील. आरक्षण दिल्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका. त्यांना भेटल्यावर सांगतो बोलवता धनी कोण आहे. एकीकडून गोड बोलतात आणि दुसरीकडून गुन्हे दाखल करतात. यामुळे मी बोलतो. त्यांच्यामुळेच भाजप संपायला लागली आहे. गोरगरिबाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात आणि स्वतःला उच्च नेते म्हणवतात. तुला आता कळेल. तुम्ही उच्च आहात की मतदानाच्या चिठ्ठ्या वाटायच्या झालात हे थोडे थांबल्यावर कळेल," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.