Friday, April 26, 2024
Homeराजकीय5 जुनचा मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल - विनायक...

5 जुनचा मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल – विनायक मेटे

पुणे(प्रतिनिधि)

मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा राज्य सरकारने केला आहे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून आता 5 जुनचा मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल, आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.

- Advertisement -

सारथी संस्थेसंदर्भात विदयार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत, पीचडी करणारे 241 मूला मुलींनी मुलाखती दिल्या मात्र गेल्या दीड वर्षापासून या विद्यार्थ्यांना फेलोशिपचा एकही पैसा मिळालेला नाही. दुसरीकडे एमफिल बंद झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे या मुद्दयावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सारथी संस्थेत जाऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सारथी संस्थेमार्फत मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप जून महिन्यात दिली जाईल असे आश्वासन सारथीच्या संचालकांनी दिले आहे अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिली.

अजित पवार यांनी सारथी संस्थेकडे लक्ष दिल्यानंतर आता चांगलं काम होत असून सारथी संस्थेला स्वतःची जागा मिळवून देण्याचे काम अजित पवारांनी केले असे सांगत संस्थेत 41 कर्मचारी अधिकारी भरण्यास मान्यता देखील देण्यात आल्याचे मेटे म्हणाले. यावेळी मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले, मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा सरकारने केलाय, सरकारच्या नाकर्तेपणा मुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून आता मोर्चा हा मुक मोर्चा नसेल, तो बोलका असेल, आम्ही सरकारला सळो की पळो करून सोडणार असा इशारा त्यांनी दिला. यावेळी मेटे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर ही टीका केली, वडडेटीवार यांना ओबीसीचा नेता व्हायची घाई झालीये, त्यामुळे ते काही ही बोलत असून त्यांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही असे मेटे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या