विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले...

मुंबई | Mumbai

आमदार अपात्रता (MLA Disqualification case) प्रकरणी निर्णय कायद्याच्या चौकटीतच राहून घेतला जाईल. आपल्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) म्हणाले. मतदारसंघातील व्हायरल व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण देताना राहुल नार्वेकरांनी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ज्यांना संविधान आणि नियमाचे ज्ञान नाही. त्यांना माहीत नाही की या सर्व प्रक्रियेत कोणते नियम लागू होतात. असे सांगत आमदार राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

ठाकरे गटाने ट्वीट करत म्हटले की, परदेश दौरा रद्द झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष संतापलेले दिस आहे, या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “अनेक माध्यमातून आणि लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परंतु, मी या पूर्वी देखील सांगितल्याप्रमाणे माल जो आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायचा आहे, तो संविधानात ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या आधारावरच मी निर्णय घेणार आहे. कोणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचे आरोप केले. तरी ही मी यात कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसार काम करणार आहे.”

त्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही

आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या रद्द झालेल्या परदेश दौऱ्याबाबत ट्वीट केले होते. त्यासंदर्भातही आज राहुल नार्वेकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "माझा परदेश दौरा मी २६ सप्टेंबरलाच रद्द केलेला. माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही, असे २६ तारखेलाच CPA ला कळवले होते. पण २८ तारखेला उगाच त्या दौऱ्याबाबत मोठी चर्चा घडवून, त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावल्याचा केविलवाणा प्रकार काही नेत्यांनी केला. पण त्यांचा हा प्रयत्न आहे की, कसेही करुन अध्यक्षांवर दबाव आणायचा. पण अध्यक्ष त्यांच्या या गिधाड धमक्यांना घाबरत नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होत नाही, त्यामुळे नियमांनुसारच कामं होणार."

“मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधानपरिषदेच्या आमदारांमार्फत चालवित नाही, असा अप्रत्यक्ष टोला राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना लावला आहे. मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरून काम करतो. मी आजही दिवसातील चार तास माझ्या कार्यालयात बसून मी माझ्या विभागातील लोकांचे प्रश्न सोडवितो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवण्याची सवय आहे. त्यांना हे समजणार नाही की, लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे ते. त्यामुळे त्यासंदर्भात भाष्य करायची गरज नाही.

जी लोक अडथळा आणत असतील. त्यांची कानउघडणी करतो, असाच तो एक प्रकार होता आणि त्याचा कोण विपरित अर्थ काढण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्या लोकांना त्याबद्दल शुभेच्छा. या प्रयत्नातून अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही. हे मी परत एका महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो.”

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com