
मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट (Thckeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) असे दोन गट पडले. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला...
दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने अंतिम निकाल येईपर्यंत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.
काल निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर शिंदेंसह काही बड्या नेत्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये एक मोठा बदल केला आहे. निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल पिक्चर हे धनुष्यबाण केले आहे.
स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.
या नेत्यांनी बदलले प्रोफाईल पिक्चर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, बंदरे आणि खणिकर्म मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे आदी नेत्यांनी प्रोफाईल पिक्चर हे धनुष्यबाण केले आहे.