Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना माहीमच्या हिंदुजा रूग्णालयामध्ये (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यवर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहे.

मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या उपचार सुरु आहेत. थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून (Doctor) लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.

शिवसेना (Shivsena) नेते मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashami Thackeray) हिंदुजा रूग्णालयात पोहचले आहेत. वृद्धपकाळामुळे मागील अनेक वर्ष मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.

मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले आहे.

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com