ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार?

विद्यमान आमदारांचा राजीनामा
ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार?

कोलकाता | Kolkata

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. तृणमूल काँग्रेसने भाजपचा पराभव करत आपली शक्ती दाखवली आहे. मात्र, बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. आता राज्यात बहुमत मिळाले पण ममता बॅनर्जींचा पराभव झाल्यानं पुढच्या सहा महिन्यात त्यांना कोणत्याही मतदारसंघातून विधानसभा सदस्य होणं गरजेचं आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ भवानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहेत. भवानीपूर मतदार संघातील आमदार शोभन देव चॅटर्जी यांनी राजीनामा दिला आहे. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघ आहे. राजीनामा देण्याआदी शोभन देव चॅटर्जी यांनी म्हटलं की,'मुख्यमंत्री बॅनर्जी यांना सहा महिन्यांच्या आत कोणत्याही मतदारसंघातून विजय मिळवायचा आहे. मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवली आणि जिंकलो. आता ममता निवडणूक जिंकाव्यात यासाठी मी राजीनामा देत आहे. ममता बॅनर्जींचा विजय आमच्या सर्वांसाठी आहे.' शोभन चॅटर्जी यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे.

ममता बॅनर्जा यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २९२ जागांपैकी २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १,९५६ मतांनी पराभव केला. असं असलं तरी पक्षानं त्यांची नेतेपदी निवड केली आणि ५ मे २०२१ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ममता दीदींना सहा महिन्यात विधानसभेवर निवडून जावं लागणार आहे. यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून त्यांनी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाची निवड केली आहे. ममता दीदी या मतदारसंघातून यापूर्वी विजयी झाल्या आहेत.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते काजल सिन्हा यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक निकालापूर्वी सिन्हा यांचे करोनामुळे निधन झाले. मात्र, जनतेने कौल दिल्यामुळे निवडणूक निकालात ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आता खरदह येथील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर शोभन देव चॅटर्जी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com