ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता l Kolkata

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेतली आहे. राज्यपाल जगदीप धनकर यांनी बुधवार त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

ममता बॅनर्जी या आज सकाळी १० वाजून ४५ मिनीटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राजभवनात साधेपणाने हा शपथविधी पार पडला.

विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. तृणमूल काँग्रेस २०० पेक्षा अधिक जागा मिळवत, एकहाती विजय मिळवला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com