Friday, April 26, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींकडून अपमानास्पद वागणूक; ममतांचा आरोप

पंतप्रधान मोदींकडून अपमानास्पद वागणूक; ममतांचा आरोप

मुंबई | Mumbai

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

- Advertisement -

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत बोलण्याची संधीच मुख्यमंत्री बॅनर्जी यांना मिळाली नाही. याबद्दल ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर आपली निराशा आणि रोष व्यक्त केला आहे.

या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही बोलू दिलं नाही, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ममता बॅनर्जी यांनी मोदी यांच्यावर आरोप केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आम्हाला पंतप्रधानांनी काहीही बोलू दिलं नाही. या बैठकीत आम्हाला पुतळ्यासारखं बसवून ठेवलं. शिवाय तेही आमच्याशी बोलले नाहीत. फक्त काही भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधी दिली होती. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं आणि बैठक संपली.’

तसेच, ‘पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत चार ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन आणि ब्लॅक फंगस समस्येसंदर्भात कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. तसंच त्यांनी लसीकरणा संदर्भातही आमच्याकडे विचारणा केली नाही. त्यांची ही वागणूक अपमानास्पद होती, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या