Friday, April 26, 2024
Homeराजकीयमहायुतीचे उद्या राज्यव्यापी दूध आंदोलन

महायुतीचे उद्या राज्यव्यापी दूध आंदोलन

मुंबई |Mumbai – दूध उत्पादक शेतकर्‍यांना (Milk Producer Farmers) प्रति लिटर 10 रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला 30 रू. दर द्यावा या मागण्यांसाठी सोमवारी महायुतीतील घटक पक्ष राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करणार आहेत.

राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासंदर्भात महायुतीतील घटक पक्षांची रविवारी बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आ. सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आ. विनायक मेटे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकूर व चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते.

- Advertisement -

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटांत सापडला असून दुधाचे भाव 16 ते 18 रूपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील करोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकर्‍यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठराविक दूध संघापूरतीच मर्यादित असून राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे अशा भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केल्या. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच्या आंदोलनातून जर काही निष्पन्न झाले नाही तर एक ऑगस्टला मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या