...अखेर 'मविआ'चा तिढा सुटला; विधानपरिषदेच्या ५ जागा लढणार एकत्र

महाविकास आघाडी
महाविकास आघाडी

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या (Legislative Council) पाच जागांसाठीचा मार्ग काढण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीचा महाविकासआघाडीचा तिढा अखेर सुटला आहे...

नाशिक (Nashik) आणि अमरावतीत (Amravati) काँग्रेसचा (Congress) उमेदवार, नागपुरात (Nagpur) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena), मराठवाड्यात (Marathwada) राष्ट्रवादीचा (NCP) आणि कोकणात (Kokan) शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.

महाविकास आघाडी
ताशी १२० किमी वेग, एकाच उडीत 'त्याने' कापले तब्बल २२ फूट अंतर; पाहा Viral Video

नाशिकमधून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे पदवीधर मतदारसंघातून रिंगणात आहेत. अमरावती विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून धीरज लिंगाडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

नागपूरची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यास सुरूवातीला काँग्रेस तयार नव्हती, त्यामुळे मविआत पेच निर्माण झाला होता. मात्र एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही एक पाऊल जरी मागे आलो असलो तरी आम्ही विचारधारेच्या विरोधात आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी
सावधान! केळी खाताय? आधी 'हा' व्हिडीओ पाहा...

दरम्यान, भाजप-शिंदे गटदेखील विधानपरिषदेच्या जागा एकत्र लढणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारांची घोषणा केली. पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील, मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील आणि कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नागपूरमध्ये भाजपप्रणित नागो गाणार हे लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नाशिकबद्दलच्या निर्णयाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com